पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर दिनांक २६ मार्च २०२५ रोजी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कोर्टी , पंढरपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागात एक्सप्लोरिंग मशीन लर्निंग टेकनिक्स थ्रु हैंडस ऑन टू बिल्ड ए.आय. ॲप्लिकेशन्स या विषयावर शिक्षक विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री.भाविक शाह यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्री.भाविक शाह यांचे डॉ. एस. व्ही. पिंगळे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री. भाविक शाह यांनी शिक्षकांना ए.आय. वापर कसा करायचा याचे मार्गदर्शन केले, तसेच या क्षेत्रातील संधी आवश्यक कौशल्य याची उपयुक्त माहिती दिली. या शिक्षक विकास कार्यक्रमात शिक्षकांनी ज्युपिटर नोटबुक वापरुन प्रात्यक्षिक केले. या कार्यक्रमास ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने शिक्षक हजर होते. या कार्यशाळेला संगणक विज्ञान व अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.
या शिक्षक विकास कार्यक्रमाचे आयोजन संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. बाळकृष्ण जगदाळे व आभार प्रदर्शन प्रा. पुनम गवळी यांनी केले.