मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखाप्रमुख अजित भोगले यांच्या पुढाकाराने विभागातील नागरिकांसाठी आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, विविध सर्टिफिकेट, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आरोग्य कार्ड, गुमास्ता लायसन्स आणि इतर विविध दाखले मिळविण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रामनगर शिवसेना शाखा क्रमांक ५४ येथे दिनांक १९ ते २३ मार्च पर्यंत सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत शिबिर रामनगर गोरेगाव पूर्व येथे आयोजित केले असून नागरिकांनी या संघीचा मोठा उपयोग करून घ्यावा असे आवाहन भोगले यांनी केलं आहे.