पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
८ फेब्रुवारी २०२५ –एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे उद्योजकता विकास कक्ष (EDC) व इन्स्टिट्युट इनोव्हेशन कौन्सिल (IIC) यांच्या संयुक्त विद्यमाने "विद्यार्थ्यांसाठी प्रवेगक/इन्क्युबेशन संधी - नवोदित उद्योजकांसाठी" या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
हे सत्र सकाळी ९:०० ते ५.00 या वेळेत महाविद्यालयाच्या एसी सेमीनार हॉलमध्ये घेण्यात आले. या कार्यक्रमास मुख्य अतिथी मिस. भाग्यश्री वठारे, BVC च्या संस्थापक व संचालिका प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप, इनोव्हेशन आणि प्रवेगक संधींबाबत मार्गदर्शन केले नवीन उद्योग उद्योगांसाठी संधी व विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले
सिंहगडचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, प्रा. ए. एस. कुलकर्णी उद्योजकता विकास कक्ष प्रमुख (EDC Cell-In charge), डॉ. एस. जी. कुलकर्णी उपप्राचार्य व इनोव्हेशन कौन्सिलचे अध्यक्ष (Vice-Principal & IIC President) यांनी या सत्राचा उद्देश विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स, इनोव्हेशन आणि प्रवेगक/इन्क्युबेशनच्या संधींबाबत माहिती देणे, त्यांना उद्योग क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि नवोदित उद्योजकांना प्रोत्साहन देणे हा आहे. यामध्ये प्रात्यक्षिक अनुभव, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि नवकल्पनांचे महत्त्व समजून घेण्याची संधी मिळणार आहे अशी माहिती दिली.
विद्यार्थ्यांना संशोधन, नवसंशोधन आणि उद्योजकता क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ही कार्यशाळा एक महत्वपूर्ण टप्पा ठरेल. यामध्ये प्रशिक्षण, नेटवर्किंग आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे, जे त्यांना भविष्यात स्टार्टअप सुरु करण्यासाठी मदत करेल. या कार्यक्रमासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हील, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनियरींग या डिपार्टमेंटचे विद्यार्थी उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गीता नवले , कु.वैष्णवी पाटील यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. अतुल कुलकर्णी, डॉ. अतुल आराध्ये, प्रा.लक्ष्मीकांत जोशी, प्रा.महेश झाडे, प्रा.मनोज कोळी, प्रा. प्रदीप व्यवहारे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.