19 फेब्रुवारीला होणार पेनूर करांच्या आनंदाचा तसेच सुवर्णक्षणांचा सोहळा साजरा
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी पेनूर येथील शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे यांनी अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जात छत्रपतींच्या स्मारकाची उभारणी केली व पेनूरच्या शोभेत मानाचा तुरा तसेच सुवर्णक्षणांचा सोहळा साजरा करण्याची संधी दिली.
यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अश्वारूढ पुतळा दिला तर स्मारकाच्या उभारणीसाठी चरणराज चवरे यांनी स्वखर्चाने स्मारक बांधले याच स्मारकाचा लोकार्पण सोहळा 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून पेनूर करांच्या आनंदात सुवर्णक्षणांचा योग येणार असून या लोकार्पण सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असून कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तर खासदार श्रीकांत शिंदे तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार गोरे व मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने,पंढरपूरचे प्रांत अधिकारी सचिन इथापे,गटविकास अधिकारी विवेक जमदाडे,मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक,मोहोळ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे,माजी सरपंच तथा भाजपा मोहोळ विधानसभा निरीक्षक रमेश माने,उपसरपंच सागर चवरे,सरपंच सुजित आवारे,सुहास आवारे,पैलवान बाळासाहेब चवरे तसेच पेनूरचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ माने आदी मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्यासाठी लागणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान तसेच ग्रामपंचायत पेनूर यांच्याकडून मिळाली. या सोहळ्यासाठी पेनुर व पेनुर पंचक्रोशीतील नागरिकांनी हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आली.