पं.संजय गरुड यांच्या दमदार आवाजाने दत्तनामाच्या गजराने दत्तभक्त मंत्रमुग्ध
गाणगापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री दत्त महाराज यांचे निवासाने पावन झालेल्या गाणगापूर क्षेत्री श्री महाराजांच्या निमित्ताने गाणगापूर येथील दंडवते महाराज मठामध्ये मठाधिपती परम पूज्य योगीराज महाराज दंडवते.पूज्य श्री.गोविंद महाराज दंडवते.व दंडवते परिवार आणि जोतिषाचार्य माधव कुलकर्णी यांचे उपस्थितीत पं.डॉ संजय गरूड यांच्या दमदार स्वरांची दत्त स्वरपूजा संपन्न झाली.
प्रारंभी वारकरी संप्रदायाचा बीज मंत्र जय जय राम कृष्ण हरी ने सुरुवात करुन वातावरण भक्तिमय झाले.त्यानंतर पंढरी निवासा सखा पांडुरंगा.माझे जीवन गाणे.सुरत पिया छीन.भैय्या गाडीवाला गाडी दिले हाक रे.मत कर मोह तू अतिशय सुंदर भैरवी सादर करत उपस्थित दत्त भक्तांना मंत्रमुग्ध केले.दमदार गायकी,आणि पहाडी आवाजाने रसिकांना आपल्या आवाजाने भुरळ घातली.त्यांना तितकीच सुंदर आणि दमदार साथसंगत तबला रोहन पंढरपूरकर पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम ओंकार पाठक टाळ विद्याधर चौधरी स्वरसाथ विकास पाटील गणेश ढाकोळ यांनी करत तबला पखवाज जुगलबंदी ने कार्यक्रमाची आणखी रंगत वाढली.सर्व दत्त भक्तांसाठी ही अभंगवाणी अविस्मरणीय ठरली.
सर्व कलाकारांचा सत्कार योगीराज महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगीराज महाराज दंडवते यांच्या शिष्य परिवार आदींनी अधिक परिश्रम घेतले.