कळवा प्रतिनिधी तेज न्यूज
ठाणे येथे नुकत्याच बेडेकर कॉलेजच्या श्रीमंत पेशवाई हॉलमध्ये संपन्न झालेला 2025 चा प्रिन्स अँड प्रिन्सेस स्टार महाराष्ट्र हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात व उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून बालकांने सहभाग घेतला. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कलाकार श्री. दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर उपस्थित होते .तसेच मुख्य व तपासी अधिकारी (अँटी पायरसी- सेल, मुंबई) श्री. जितू गुप्ता सर , 2024 च्या मिसेस सौ. हर्षाली आणि सौ.जीविका, श्री. केवल घाला (कास्टिंग डायरेक्टर) श्री. मंदार काने (प्रोडूसर) आणि अस्मी फाउंडेशनच्या सौ दिपाली आणि सौ रजनी आदी उपस्थित होत्या.
संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो मुलांनी यावेळी सहभागी होत स्पर्धेत रंगत आणली. या स्पर्धेत कळवा येथील रायझिंग स्टार शाळेच्या मुलांचे सादरीकरण अत्यंत वाखण्याजोगे होते. 2025 ची रायझिंग स्टार स्कूलची विद्यार्थिनी प्रिन्सेस स्टार महाराष्ट्र ही प्रथम क्रमांकाने कु. त्रिशा बारस्कर (वय वर्ष 4) ही ठरली तर त्याच शाळेची रणरअप कु. अरवी सुतार( वय वर्ष ३) ही ठरली. मुलांमध्ये प्रिन्स स्टार महाराष्ट्र हा सुद्धा रायझिंग स्टार शाळेचा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने क्रु. क्रिशिव भोईर (वय वर्ष 10) तसेच छोट्या गटांमध्ये फर्स्ट रनरअप ऑफ विद्ववान शेट्टी( वय वर्ष 5 ) व सेकंड रनरअप क्रिशू वैभव चव्हाण ( वय वर्ष 5) ,तसेच प्रिन्सेस ऑफ बेस्ट अटीट्यूड कु.अंशिका भाष्टे ( वय वर्ष 4),प्रिन्सेस ऑफ बेस्ट डॅझेर्लिंग स्माईल कु. कुशाग्री अनिकेत मयेकर (वय वर्ष 4), बेस्ट फॅशन आयकॉन कु. श्रेयस सूर्यवंशी (वय 7) तर बेस्ट आयकॉन गर्ल कु. अरुनिता प्रजापती या सर्व रायझिंग स्टार स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे सगळीकडेच कौतुक होत आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चिमुकल्या हिऱ्यांना योग्य असे पैलू पाडणाऱ्या रायझिंग स्टार शाळेच्या उपक्रमाशील आणि अत्यंत सजग अशा प्रयोगशील मुख्याध्यापिका ममता मसूरकर व त्यांच्या शाळेचे व शिक्षकांचे योगदान अनन्य साधारण असल्यामुळे सर्व स्तरांवर त्यांचे खूप कौतुक होत आहे आजच्या पिढीला खूप संस्कार शील घडवण्याचा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, वेगळ्या स्तरांवर स्वतः ममता मसूरकर या मुलांना घेऊन जात असतात. व त्यांच्या या कौतुकाचं संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक मान्यवर कौतुक करत आहेत.