गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.दरवर्षी शाळेमध्ये शिवजयंतीची तयारी मोठ्या उत्साहामध्ये केली जाते .
यावर्षी विद्यार्थ्यांनी पारंपारिक लोकगीते त्याचबरोबर शिवजयंती वर आधारित लोकधारा गीते त्याचबरोबर शिव विचार विद्यार्थ्यांनी व्यक्त केले .विद्यार्थ्यांनी आपली कलाविष्कार सादर करत असताना पालकांची व शिक्षकांची मने जिंकली. लहान चिमुकल्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी पालक प्रतिनिधी मधून संभाजी ब्रिगेडचे हनुमंत बागल यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी समाधान बागल, प्रमोद बागल, गणेश फाटे ,उद्धव बागल, प्रवीण बागल ,वैभव भोसले ,विठ्ठल भोसले ,संतोष नागणे, आजिनाथ नागणे, शितल बागल ,नाथा बागल, नितीन बागल ,नितीन मस्के ,स्वाती बागल ,शीतल पाटील, शितल मस्के, वर्षा मोरे ,लीना बागल ,फर्जद्दीन पटेल, सीमा रकटे ,अजय मोरे शिवाजी पवार,आदी उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन आभार मानले.