शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे येथे आज गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी शेळवे गावचे सरपंच अनिल ज्ञानोबा गाजरे,नवनिर्वाचित उपसरपंच रामचंद्र दिगंबर गाजरे, मा. उपसरपंच किरणदादा गाजरे,मा.उपसरपंच तुकाराम गाजरे,प्रगतशील बागायतदार तसेच उद्योजक सदाशिव गाजरे,खेड भाळवणी गावचे युवा नेते व उपसरपंच शहाजी पाटील,प्रगतशील बागायतदार विठ्ठल (आप्पा) गाजरे, बाळासाहेब गाजरे,दगडू आबा गाजरे,तुकाराम निवृत्ती गाजरे,अनंता श्रीखंडे,युवा नेते बाबासाहेब पवार,युवा नेते गोपाळ गाजरे,उद्योजक समाधान भैय्या गाजरे,ऍड.सुधाकर गाजरे,राजेंद्र गाजरे,सुरज गाजरे,सुरेश गाजरे,रोहन गाजरे,दत्तात्रय शिनगारे, पवन घालमे, सागर गाजरे तसेच सर्व शिक्षक वृंद पालक,विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
शेळवे गावाच्या उपसरपंच पदी नुकतीच निवड झालेले शेळवे गावचे संयमी नेतृत्व श्री.रामचंद्र दिगंबर गाजरे यांचा प्रशालेच्या वतीने सन्मानपर सत्कार करण्यात आला,तसेच शेळवे गावचे सुपुत्र अजित सत्यवान गाजरे यांची आयडीबीआय बँकेच्या ई.एस.ओ पदी निवड झाले बद्दल व खेड भाळवणी गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर साळुंखे यांची मुंबई पोलीस पदी निवड झाले बद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशालेच्या वतीने सन्मान करण्यात आला.
केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेने घवघवीत यश संपादन करत प्रशालेचे विद्यार्थी मुख्य गुणवत्ता यादीस पात्र झाले, त्या मध्ये कु.संचिता बाबासाहेब पवार हिने तब्बल ११८ गुण मिळवत मुख्य गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळवला,कु.ओम अनंता श्रीखंडे याने १०१ गुण व कु.अक्षरा धुमाळ हिने ७२ गुण मिळवत सारथी शिष्यवृत्तीसाठी आपले स्थान निश्चित केले..
या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशालेच्या वतीने करण्यात आला..
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बँकिंग ची पोस्ट काढलेले अजित सत्यवान गाजरे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या आयुष्यातील स्पर्धा परीक्षेचे महत्व समजावून सांगितले,तसेच सनराईज पब्लिक स्कूल मध्ये स्पर्धा परीक्षेची पायाभरणी केली जाते, कोणतीही अतिरिक्त फी न घेता येथील शिक्षक अहोरात्र कष्ट घेऊन विद्यार्थ्यांना घडवत असतात असे प्रतिपादन त्यांनी केले,तसेच पोलिस दलात निवड झालेले कु.ज्ञानेश्वर साळुंखे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्व पटवून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रम शील शिक्षक मोहन गायकवाड यांनी केले तर प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी केले, कार्यक्रमाचे आभार संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी केले, कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.