सातारा प्रतिनिधी तेज न्यूज गुरुनाथ तिरपणकर
सातारा कोष्टी व्हिजन ट्रस्ट (केव्हीटी) तर्फे पौष पौर्णिमेनंतर महाराष्ट्रातील नागेवाडी, जि.सातारा येथील एकमेव पुरातन व सिध्दपीठ श्री.शाकंभरी देवी मंदिरात सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी महिलांना श्री. शाकंभरी देवी दर्शन तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या ०५ ते १८ वयोगटातील मुला मुलींना प्रोत्साहनपर पुरस्कार वितरण असा दुहेरी कार्यक्रम रविवार दि. ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री. शाकंभरी देवी मंदिरात संपन्न झाला.
सातारा जिल्हयातील कोष्टी समाज अध्यक्ष व उपस्थित समाज बांधव यांचे हस्ते पुजा व आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली. महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ, मुंबईचे माजी विश्वस्त व सरचिटणीस ॲड. श्री. ज्ञानदेव सरोदे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तर कोष्टी समाज सेवा मंडळ, डोंबिवलीच्या अध्यक्षा सौ. अनिता वाघवकर या विषेश अतिथी होत्या. याप्रसंगी सन्माननीय उपस्थितीत कोष्टी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अरूणराव वरोडे, इचलकरंजीचे उद्योगपती सौ. व श्री. उत्तमराव म्हेत्रे, सातारा जिल्हा परिषदेचे मा. शिक्षण व अर्थ सभापती ॲड. भास्करराव गुंडगे, बारामतीचे श्री. रमेश भंडारे, उंब्रजचे अध्यक्ष श्री. विवेक लाटे, साताऱ्याचे श्री. संदिप पवेकर, कोरेगावचे अध्यक्ष श्री. आनंद गोरे, पुसेगावचे श्री. संतोष तारळकर, तारळेचे श्री. औदुंबर कुरकुटे, कोळेवाडीचे श्री. अमृत नेमाणे, कुडाळचे श्री. प्रमोद खटावकर यांसह अनेेक भागातून आलेले कोष्टी समाज बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहूणे ॲड. ज्ञानदेव सरोदे यांनी केव्हीटी तर्फे सुरू असलेल्या समाजोपयोगी व संघटनात्मक कार्याचा गौरव करून यापुढेही केव्हीटीचे कार्यात सहभागी होईल असे सांगितले. श्री. शाकंभरी देवीचे एकमेव सिध्दपीठ असलेल्या मंदिरात सामाजिक कार्यक्रमाचे आयोजनामुळे मंदिर परीसर पाहण्याची संधी व कुलदेवीचे दर्शन केव्हीटीने घडवले असे विषेश अतिथी सौ. अनिता वाघवकर यांनी सांगितले. राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अरूणराव वरोडे यांनी मुलांना दिलेल्या पुरस्काराचे विषेश कौतुक केले.
तसेच केव्हीटी तर्फे बारामतीत घेणेत येणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनास सर्वाेपरी मदत व सहकार्य करेल असे आश्वस्त केले. प्रा. श्री. दिनेश सरोदे, दहिवडीच्या माजी नगराध्यक्षा सौ. साधना गुंडगे, वाईचे श्री. सुनिल कुमठेकर आदींनी मनोगत व्यक्त केले. महिलांना श्री शाकंभरी देवी दर्शन घडावे तसेच युवा पिढीला केवळ प्रोत्साहन न देता कुलदेवी दर्शन, कुलाचार, संस्कार व त्यांचेत धार्मिक भावना वाढावी या हेतूने मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थापक सचिव ॲड. सचिन देवांग यांनी प्रास्ताविकात सांगितले. पुरस्कार वितरण कार्यक्रम व सुत्रसंचालन खजिनदार ॲड. संदेश गुंडगे यांनी केले. दहिवडीच्या गुरूकृपा भजनी मंडळाने भजन सेवा दिली. केव्हीटी तर्फे महिलांना जवळच असलेल्या श्री क्षेत्र संगम माहुलीचे देखील दर्शन घडविण्यात आले.
या कार्यक्रमाचे नियोजन टिम केव्हीटी समन्वयक सौ. स्वाती भंडारे, सौ. सुवर्णा भुजबळ, सौ. सुवर्णा सरोदे, ॲड. सुषमा देवांग यांनी केले. वृत्तांकन व प्रसिध्दी केव्हीटी कार्याध्यक्ष श्री. गुरूनाथ तिरपणकर यांनी केली.