पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, कोर्टी येथील प्राध्यापकांचे बेंथम सायन्स, सिंगापुर प्रकाशकाकडुन प्रकाशित झालेल्या "थिन फिल्म नॅनोमटेरियल्सः सिन्थेसिस, प्रॉपर्टीज अँड इंनोवेटिव्ह एनर्जी अॅप्लिकेशन्स" या पुस्तकास स्कोपस इंडेक्स मानांकन प्राप्त झालेची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांनी दिली.
सिंहगड महाविद्यलयातील प्रा. डॉ. संपत देशमुख, प्रा. डॉ. कैलास करांडे, प्रा. डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि एस. व्ही. एन. आई. टी. सुरत येथीलप्रा. डॉ. विपुल खेराज यांनी संपादक म्हणून काम पाहिले.
नॅनोतंत्रज्ञान हे आधुनिक विज्ञानाच्या प्रगत शाखापैकी एक असून ऊर्जा क्षेत्रात त्याचा फार मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. या पुस्तकात थीन फिल्म नॅनोमटेरिअल्सचे उत्पादन, त्याचे विविध प्रकार, आणि सौरऊर्जा, बॅटरी तंत्रज्ञानसह इतर ऊर्जाक्षेत्रातील उपयोग याबद्दल सखोल माहिती देण्यात आली आहे.
स्कोपस इंडेक्सकडून पुस्तकात प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन पडताळणी करून स्कोपस इंडेक्सचा दर्जा दिला आहे. नॅनोमटेरिअल्स मधील लेखनाची गुणवत्ता ऊर्जाक्षेत्रात संशोधन करणाऱ्यासाठी हे पुस्तक संदर्भीय ग्रंथ म्हणून उपयोगी होणार आहे. स्कोपस इंडेक्स मानक मिळण्यासाठी या पुस्तकाचे तज्ञ संशोधकांकडून परीक्षण केले गेले.
या पुस्तकाच्या स्कोपस इंडेक्स मांनकामुळे थिन फिल्म नॅनोमटेरियल्स या विषयावर अधिक सखोल अभ्यास करता येणार असून ऊर्जाक्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधनास चालना मिळेल असा विश्वास वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या विशेष पुस्तकाचे संपादक म्हणून काम केल्याबद्दल समाजातील विविध मान्यवरांकडून संपादकास शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.