सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, सोलापूर आणि वारसा फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी आगामी 395 व्या शिवजयंती निमित्त शालेय परिसरात 'मध्ययुगीन आणि शिवकालीन नाण्यांचे प्रदर्शन' भरवण्यात आले.
यावेळी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे ही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आणि नाण्यांची इत्यंभूत माहिती देण्यासाठी वारसा फाउंडेशन चे संस्थापक श्री. नितीन अन्वेकर यांची प्रमुख उपस्थिती दर्शविली. शिवकालीन ' शिवराई ' आणि मौर्यकालीन जगातील सर्वात लहान नाणी हे प्रदर्शनातील मुख्य आकर्षण होते. या बरोबरच इंदोर च्या होळकर घराण्यातील मोडी लिपीतील मराठी भाषिक व्यवहारिक पत्रे ही विद्यार्थ्यांना पहायला मिळाली.
या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे उत्साही आयोजन करणाऱ्या श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, सोलापूर च्या मुख्याध्यापिका सौ. नीता सोमवंशी, पर्यवेक्षक समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे श्री सिध्देश्वर शिक्षण संकुलाचे संचालक श्री. धर्मराज कडादी सर व शालेय गुणवत्ता वाढ समितीचे अध्यक्ष डॉ. राजशेखर येळीकर यांनी कौतुक करत आगामी कार्यक्रमांसाठी प्रोत्साहित केले.