शिक्षण विभागाकडून चौकशी, संगवे व क्षेत्रीय प्राधिकरणाच्या सदस्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश
शाळा प्रशासनाकडून रु २ कोटी ३७ लाख दंड वसुल करण्याची मागणी
मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्रातील ६७४ अनधिकृत शाळांवर कार्यवाही करताना धारावीतील अनाधिकृत मॉर्निंग स्टार शाळा प्रशासनाने सन २०१८ पासून आरटीई नियमानुसार अनधिकृत शाळा चालविल्याबद्दल रु १ लाख व दिवसागणिक रु १००००/- हा दंड न भरल्याबद्दल शिक्षण निरीक्षक दक्षिण मुंबई यांनी गुन्हा दाखल केला होता.
पण शाळा बंद न करता या शाळेला नवीन शाळा सुरु करण्याचे इरादापत्र शिक्षण विभागाने दिल्याची बाब समोर आल्यावर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे नितीन दळवी यांनी या बाबतची तक्रार शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाकडे केल्यावर, आयोगाच्या निर्देशावर शालेय शिक्षण विभागाने या शाळेचे इरादापत्र रद्द केले व शाळा बंद करून शाळेत शिकत असणाऱ्या ७०० विद्यार्थ्यांचे समायोजन विभागातील दुसऱ्या शाळेत करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरु केली, महासंघाचे नितीन दळवी यांनी इरादापत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही करण्याची मागणी केली होती, त्यावर कार्यवाही करताना शालेय शिक्षण विभागाने शिक्षण उपसंचालाक संदीप संगवे व त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या क्षेत्रीय प्राधिकरणाच्या सदस्यांची चौकशी सुरु केल्याची व त्यांच्या कडून खुलासा सादर करण्याचे आदेश दिल्याची बाब समोर अली आहे, म्हणून अनधिकृत शाळा बंद न करता मागच्या दारातून त्या शाळेला नवीन इरादापत्र देण्याचा प्रकार उपसंचालक संदीप संगवे व प्राधिकरणाच्या सदस्यांच्या अंगलट येण्याची शक्यता दिसत आहे.
शालेय शिक्षण विभागाने उपसंचालक संदीप संगवे व त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या प्राधिकरणाच्या सदस्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत, शालेय शिक्षण विभागाने पाठवलेल्या पत्रानुसार मॉर्निंग स्टार हि शाळा अनधिकृतपणे चालू असणे, सदर शाळा अनधिकृतपणे चालू असल्याचे निदर्शनास आल्याने सदर शाळेस रुपये एक लक्ष इतका दंड शासन खाती जमा करण्याबाबत कळविले असणे , सूचना देऊनही सदर शालेय व्यवस्थापनाने अनधिकृत शाळा बंद न केल्याने सदर शाळेस प्रतिदिन रुपये दहा हजार इतका दंड आकारण्यात येत असल्याबाबत सूचना देणे, सदर दंड शासन खात्यात जमा न करून शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने सादर शालेय व्यवस्थापन/शाळेविरुद्ध पोलीस ठाणे, धारावी येथे फौजदारी गुन्ह्याची नोंद होणे इत्यादी बाबी माहिती असतानाही मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूल या अनधिकृत शाळेचा इरादा पत्रासाठीचा प्रस्ताव जणूकाही नवीन शाळेचा प्रस्ताव असल्याप्रमाणे श्री संदीप संगवे यांच्या अध्यक्षतेखालील क्षेत्रस्तरीय समितीने शासनास सादर केला, सबब इरादापत्र देणायचा प्रस्ताव शासनास सादर करताना वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास का आणण्यात अली नाही? याबाबत उपसंचालक संदीप संगवे व सर्व सदस्यांनी खुलासा सादर करावा असे आदेश आहेत
२ कोटी ३७ लाख रु दंड वसूल करण्याची मागणी
मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूल हि शाळा बंद करताना फौजदारी गुन्ह्यात नोंद केल्यानुसार दंडाची रक्कम वसूल करण्याच्या प्रकाराकडे शिक्षण विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महासंघाचे नितीन दळवी यांनी करत हा दंड आता २ कोटी ३७ लाखाच्या घरात जात असल्याने, दंडापोटी मिळणारी हि रक्कम हि शासनाचा महसूल असल्याने हि रक्कम शाळा प्रशासनाकडून वसूल करण्याची मागणी नितीन दळवी यांनी मा. प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग यांच्या कडे केली आहे, शाळा प्रशासन दंड भरण्यास असमर्थ असेल तर नियमानुसार शाळा प्रशासनाच्या/संस्थाचालकांच्या मालकीच्या जमिनीवर/मालमत्तेवर दंडाच्या रक्कमेचा बोजा चढवावा अशी मागणी आहे, महिन्याभरात दंड न वसूल केल्यास प्रधान सचिवांना शासनाचे महसुली नुकसान केल्या प्रकरणी मा. न्यायालयात खेचण्यात येईल असा इशारा नितीन दळवी यांनी तक्रारीद्वारे दिला आहे.
महाराष्ट्रातील ६७४ शाळांवर कार्यवाहीचा नुसता फार्स
महाराष्ट्रातील ६७४ अनधिकृत शाळेवर कार्यवाही करण्याचा फार्स सुरु असल्याचे नितीन दळवी यांचे म्हणणे आहे, धारावीच्या या प्रकरणा प्रमाणे कार्यवाहीच्या नावाने अधिकारी आपले खिसे गरम करत आहेत, योग्य कार्यवाही होताच नाही आहे, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा भविष्यासाठी नितीन दळवी लवकरच या प्रकारात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार.