सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रत्येक केस मध्ये उज्वल निकम हे धोरण सरकारने आता बंद करावे. ॲड.उज्वल निकमा ची गुणवत्ता तपासण्याची गरज आहे .त्यांनी आजवर सरकारी वकील म्हणून काम पाहिलेल्या प्रत्येक खटलाचे ट्रक्चरल ऑडीट झाले पाहिजे.
अशी मागणी विधी सेवा फौडैशनचे अध्यक्ष तथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कायदा विभागाचे निमंत्रक ॲड.सुरेश गायकवाड यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे
.मासा जोग प्रकरणातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्वल निकम यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय खात्याने केली आहे. ही जरा चिंतेची बाब वाटते . यातुन देशमुख कुटुंबीयाना निरपेक्ष पणे न्याय मिळेल असे वाटत नाही. कारण भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्यातील मंत्री मंडळात असणाऱ्यां महत्वाच्या मंत्र्यावर या प्रकरणात आरोप होत आहेत .
उज्वल निकम हे भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. शिवाय ते भाजपाचे स्तुती भाट आहेत.. त्यामुळे राज्यात कोणतीही घटना घडली तर यासाठी उज्वल निकम म्हणजे काय औषध नव्हे. राज्यात अनेक विधीज्ञ गुणवत्तेच्या निकषावर उजवे आहेत.यापुढे नव्या दमाच्या वकिलाना संधी देणे गरजेचे आहे. असे असताना विधी न्याय मंत्रालय उज्वल निकम यांच्याच भोवताली फिरते हे न समजलेले कोडे आहे.
भाजप च्या संस्कृतीत घडलेल्या उज्वल निकम यांची यापुढे कोणत्याही खटल्यात नियुक्ती करू नये. मसा जोग प्रकरणातील देशमुख खून खटल्यात शासनाने नियुक्त केलेली उज्वल निकम यांची नियुक्ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी विधी सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून ॲड.सुरेश गायकवाड यांनी केली आहे.याबाबत आपण मुख्यमंत्री, राज्यपाल व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचेकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे देखील म्हटले आहे.

