पुळूज प्रतिनिधी दत्तात्रय पांढरे तेज न्यूज
गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या गांधी रिसर्च फाउंडेशन एक्झाम मध्ये लिंगेश्वर विद्यालयाचे पुळूज या शाळेचे घवघवीत यश इयत्ता नववीतील कु. कशीश दिलावर मुलाणी हिने सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन गोल्ड मेडल मिळविले आहे.
तसेच इयत्ता सातवीतील कु कार्तिकी विकास सावंत हिचा व रवी विजय सलगर इयत्ता सहावी या दोघां चे सोलापूर जिल्ह्यामध्ये अनुक्रमे तृतीय क्रमांक मिळवून ब्राँझ मेडल मिळवले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे पंढरपूर चे शिक्षणाधिकारी लिगाडे साहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक व गांधी रिसर्च फाउंडेशन विभाग प्रमुख देशमुख बाळासाहेब आबासाहेब सर यांनी विद्यालयांमध्ये अभिनंदन केले यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावकऱ्यांनी अभिनंदन केले.