वर्धा प्रतिनिधी तेज न्यूज
अखिल भारतीय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन जानेवारी 2026 मधे नागपूर येथे घेण्यात येणार आहे. त्या अधिवेशनाबाबत माहिती देण्याकरिता अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भास्करराव टोम्पे, कार्याध्यक्ष ईश्वरजी धिरडे यांचेसह मुख्य समन्वयक अनंतजी जांगजोड तसेच विदर्भ शिंपी समाजाचे अध्यक्ष राजूभाऊ किटे सचिव प्रदीपजी गंधे सहसचिव राजूभाऊ मनगटे व पदाधिकारी उपस्थित होते.सकाळी ११ वाजता संत नामदेव महाराज मठ,वर्धा येथे त्यांचे आगमन झाले.संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांच्या मूर्तीस हार व पुष्प अर्पण करून त्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक अशोकजी दांडेकर, एड.निळकंठजी हूड,निळूभाऊ रुद्रकार, दिनेशजी चुन्ने,श्यामजी जुमडे,दीलीपभाऊ भाईक,संत नामदेव मठाचे कार्यकारी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजयजी जाधव, उपाध्यक्ष लताताई जुमडे,सचिव वैभव प्रकाश गांजे,सहसचिव सुरेशजी भुंबर, कोषाध्यक्ष नितीनजी पोहाणे, सुनंदाताई जुमडे,नंदाताई भाईक, प्रदीपजी घिमे,उमेशजी कटाईत,पंकजजी वाडेकर तसेच युवक मंडळाचे अध्यक्ष सारंगजी भाईक,विजुभाऊ देवरे उपस्थित होते.
यानंतर रेस्ट हाऊस वर्धा येथे वरील सर्वांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात नागपूर येथे होऊ घातलेल्या अधिवेशनाची पार्श्वभूमी तसेच पूर्वतयारी बाबत राष्ट्रीय शिंपी समाजाचे अध्यक्ष भास्करजी टोम्पे, कार्याध्यक्ष ईश्वरजी धिरडे, विदर्भ शिंपी समाजाचे अध्यक्ष राजूभाऊ कीटे,सचिव प्रदीपजी गंधे यांनी माहिती दिली.
यावेळी उपस्थित वर्धा शिंपी समाजातील जेष्ठ नागरिक तसेच संत नामदेव मठ वर्धाचे विश्वस्त मंडळाच्या वतीने विदर्भ शिंपी समाज कार्यकारणीत तसेच महिला व युवक मंडळ कार्यकारणीत खऱ्या अर्थाने समाज उन्नतीसाठी सर्व जिल्ह्यातून सदस्य संख्या वाढवून तसेच पदाधिकारी व अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष निवडताना तेच, सदस्य न निवडता, काही बदल करून नवीन सदस्यांना नियुक्त करण्याबाबत सूचना केली. व याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी अशी आशा व्यक्त केली.” एक शिंपी, लाख शिंपी “ हा जयघोष झाला .