भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शिलधन लक्ष्मण भोसले यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत मंत्रालय सहाय्यक पदी उज्वल यश संपादन केले आहे.
शिलधन भोसले यांचे प्राथमिक ते बारावी पर्यंतचे शिक्षण भाळवणी येथील जिल्हा परिषद व न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. नंतर कोल्हापूर येथील के.आय. टी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. शिलधन याचे वडील लक्ष्मण भोसले सेवानिवृत्त बस वाहक कर्मचारी आहेत.
त्याच्या या निवडीबद्दल भोसले यांचे भाळवणी गावातील सर्व स्तरांमधून कौतुक केले जात आहे. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने येथील कार्यालयात सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भीमज्योत तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.या यशाबद्दल भोसले यांचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
यावेळी शिलधन भोसले म्हणाले की, विद्यार्थ्यांनि कोणत्याही प्रकारच्या परिक्षेत सहभागी झाले पाहिजे. सतत अभ्यास केला पाहिजे.यश नक्कीच मिळेल.