सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्लिश मीडियम मध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे चेअरमन तथा श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मा. धर्मराज काडादी सर व पालक सदस्य मा. गुरुराज माळगे सर यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून व आकाशात फुगे सोडून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता कोरवार मॅडम ,पर्यवेक्षिका सुनंदा कलशेट्टी, पालक शिक्षक संघाच्या सदस्या मोनल देशमुख, स्नेहा गालपल्ली, विनुता स्वामी,आरती कोल्हापुरे, प्रतिक्षा उस्तुरगे, गायत्री कमलापुरे, वर्षाराणी हक्के, पूजा ढवळे
यांच्या हस्ते भूमिपूजन करून कार्यक्रमास सुरुवात सुरुवात केली.
प्रारंभी शाळेतील बाल चिमुकले नर्सरी ते दुसरीतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांच्या स्वागतासाठी स्वागत गीत सादर केले. तसेच इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थी झुम्बा डान्स व इयत्ता तिसरी ते पाचवीतील विद्यार्थीनीं विविध योगासनावर आधारित योगा डान्स सादर केले. मुख्याध्यापिका स्मिता कोरवार मॅडम यांनी मुलांना खेळाचे महत्व पटवून दिले. विविध क्रीडा स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांचे कौतुक केले. क्रीडा स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण श्री सिद्धेश्वर बाल मंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा हेब्बाळ यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षिका वैष्णवी सुरवसे व सर्व शिक्षिका ,शिक्षकेतर- कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन श्रेया पांढरे यांनी केले व स्वाती गंभीरे यांनी आभार मानले.