पंढरपूर तालुका प्रतिनिधी बिरुदेव केंगार
केसकरवाडी पंढरपूर ता.संजय मासाळ यांची विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी संस्था, मर्यादित केसकरवाडी संस्थेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली आहे.
केसकरवाडी विविध कार्यकारी (विकास) सेवा सहकारी संस्था, मर्यादित केसकरवाडी ता.पंढरपूर जिल्हा.सोलापूर या संस्थेच्या चेअरमन पदी संजय रखमाजी मासाळ व व्हॉईस चेअरमन पदी सौ.वंदना आप्पा केसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी मा. चेअरमन अब्बास मुजावर, ग्रामपंचायत सदस्य तानाजी केसकर,हणमंत जमदाडे सर,सूळ साहेब सातपुते सेक्रेटरी,नानासो केसकर, आप्पासो मासाळ, सौ. रेखा मासाळ, जगन्नाथ चोरमले,पांडुरंग केसकर, (मेजर )उत्तम मासाळ, राजमहंमद मुजावर, सय्यद मुजावर, तुकाराम बंडगर,तात्यासाहेब मासाळ, राजू मासाळ, दीपक केसकर, दिलीप जमदाडे, दामोदर मासाळ,दत्तात्रय गोफणे, पितांबर मासाळ विष्णू मासाळ , अनिल मासाळ, विजय मासाळ,दसूर मा. सरपंच नानासाहेब नाईकनवरे,दत्तात्रय केसकर,मायाप्पा केसकर, भोजलिंग मासाळ, मधुकर मासाळ, सुनील यमगर,इत्यादी उपस्थित होते.
यावेळी संजय मासाळ म्हणाले की सर्व संचालक व सदस्य यांना बरोबर घेऊन संस्थेचा विस्तार करणार आहे.जास्तीत जास्त सभासदांना कर्ज देण्याकरिता प्रयत्न करणार आहे.सभासदांनी जो विश्वास ठेवला आहे तो मी येणाऱ्या काळात सार्थ करणार आहे.सर्व संचालक व सभासद यांचे मी आभार मानतो व यापुढे ही सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.असे हि मासाळ म्हणाले.