पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री.दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे 63 व्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त प्रशालेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने नटलेल्या कलाविष्कार या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच सचिव ॲड. वैभव टोमके यांनी केले.
यावेळी प्रशालेतील माध्यमिक ,उच्च माध्यमिक, व्यवसाय शिक्षण विभाग या विभागातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले .यामध्ये कोळीगीत, भक्ती गीत, रिमिक्स गीत, ऐतिहासिक प्रसंग, वाघ्या मुळे, गोंधळ गीत,आदिवासी गीत अशा विविध प्रकारचे सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या या बहारदार कार्यक्रमास सर्व रसिका प्रेक्षक,पालक, विद्यार्थ्यांनी भरभरून साथ दिली, प्रोत्साहन दिले . यावेळी संस्थेचे खजिनदार सलीम भाई वडगावकर तसेच प्रशालेतील शिक्षक, राजूभाई मुलाणी,धुरके एस एम यांनी गायन कला सादर केली.
सर्व कलाकारांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ, ज्येष्ठ संचालक आपासाहेब चोपडे, संचालिका सुनिताताई मोरे सर्व संचालक मंडळ , प्राचार्य डॉ.मुंढे यु.आर .उपमुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्य लिपिक हनुमंत मोरे, ज्येष्ठ शिक्षक विलास दराडे , अशोक पवार, स्नेहसंमेलन प्रमुख बाबासाहेब सिरसट,अविनाश कटकधोंड, सांस्कृतिक विभाग प्रमुख बाळासाहेब शिंगाडे,सोमनाथ फडतरे, शितोळे एस. एम, शिंदे एम. बी. सर्व कमिटीचे प्रमुख सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी कौतुक केले.
.