राष्ट्रीय कीर्तनकारांची कीर्तने.महिलांसाठी विविध स्पर्धा.पुरस्कार वितरण सोहळा.हळदीकुंकू समारंभ.आणि व्याख्यान
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
प्रतिवर्षाप्रमाणे श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा निमित्ताने श्री चौंडेश्वरी मंदिर सोमवार पेठ करकंब येथे दिनांक ७ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले.
त्यामध्ये दररोज पहाटे ५:३० देवीची पूजा आणि काकडा दररोज संध्याकाळी ८:०० ते १० या वेळेमध्ये ७ जानेवारी कैलास बुवा खरे मुंबई यांचे कीर्तन ८ जानेवारी रोजी ख्यातनाम कीर्तनकार प्रशांत बुवा पांडव पुणे यांचे कीर्तन ९ जानेवारी रोजी श्रीपाद लिंबेकर परभणी यांचे कीर्तन १० जानेवारी रोजी ख्यातनाम कीर्तनकार डॉ.अवंतिका टोळे पुणे यांचे कीर्तन ११ जानेवारी रोजी नम्रता निमकर यांचे कीर्तन तर स्मिता आजेगांवकर यांच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होणार असून यांना तबला साथ ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम साथ राम अनवते करणार आहेत.
यावेळी दिनांक ९ जानेवारी रोजी कोष्टी समाज युवकांच्या वतीने बनाळी येथून ज्योत आणण्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सात दिवसांच्या कालावधी मध्ये दुपारी २-४ यावेळेत करकंब मधील सर्व महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून त्यामध्ये संगीत खुर्ची.पाककला स्पर्धा.वेशभूषा स्पर्धा.झटपट स्पर्धा.ताकधिनाधिन स्पर्धा.रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून सर्व महिलांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक १३ जानेवारी रोजी श्री चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूकीने या महोत्सवाची सांगता होणार असून.याच स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ, हळदीकुंकू आणि तिळगुळ वाटप कार्यक्रम महिलांसाठी मार्गदर्शक व्याख्यान श्री प्रशांत सरुडकर आणि विविध पुरस्कार त्यामध्ये करकंब कोष्टी समाज भूषण पुरस्काराचे मानकरी श्री प्रभाकर भाऊ टेके (करकंब)कै.पंढरीनाथ दुधाणे स्मृती शिक्षण पुरस्कार आदरणीय शिक्षणाधिकारी (योजना)सुलभा वटारे (अक्लुज)कै.गोरख रामचंद्र इदाते स्मृती उद्योगरत्न पुरस्कार अतुल बावकर (नातेपुते)यांना जाहीर करण्यात आला असून तो पुरस्कार प्रदान सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी सायंकाळी ५:०० वा.प्रदान करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमांना सर्व करकंबकर ग्रामस्थांनी आणि कोष्टी समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज ट्रस्ट चे अध्यक्ष मिलिंद उकरंडे.सचिव श्री विजय भागवत व सर्व सन्माननीय सदस्य आणि समाज बांधव यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधव अधिक परिश्रम घेत आहेत.