पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
स्त्री शिक्षणाच्या जनक पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्त बाल चिमुकल्याने सावित्रीचा वेश परिधान करून हातामध्ये लेखणी पुस्तक घेऊन वेश परिधान केला होता यावेळी लहान चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर खूप उत्साही वातावरण दिसत होते.
यावेळेस शाळेतील सहशिक्षिका यांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्राविषयी शितल मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रम प्रसंगी सहशिक्षिका वर्षा मोरे ,लीना बागल ,सीमा रकटे, फर्जद्दीन पटेल ,शितल बागल, दीपक देशमुख ,नियाज मुलाणी ,राजेंद्र मोलाणे, सोमनाथ भुईटे ,अजय मोरे, धनाजी सावंत, व विद्यार्थी उपस्थित होते.