भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
गुरुवार दिनांक 19 /12/ 2024 रोजी न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी तालुका पंढरपूर येथे गट शाखा स्तरावरील निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वैज्ञानिक उपकरणे व वैज्ञानिक खेळणी यांच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये भाळवणी गटामधील पिलीव ,फळवणी, महूद अकोला वासूद या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.
उद्घाटन कार्यक्रमासाठी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र लाले,पालक संघाचे सदस्य हिरालाल जमदाडे, रयत विज्ञान परिषद सोलापूर जिल्हा प्रमुख श्री कोळसे सर ,विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री रोकडे सर ,जाधव के.के. सर, विद्यालयातील विभाग प्रमुख श्री जरे सर, गटातील इतर शाखेतील मार्गदर्शक शिक्षक, विद्यालयातील शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते.
प्रथम रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री कोळसे सर यांनी केले. डॉक्टर लाले व विद्यालयाचे प्राचार्य रोकडे सर यांनी आपली मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवर व सर्वांचे आभार श्री जरे सर यांनी मानले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विधाते सर यांनी केले.
निबंध स्पर्धेमध्ये फळवणी शाखेमधील विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला. भाळवणी शाखेतील विद्यार्थिनीचा दुसरा व तिसरा क्रमांक आला. वक्तृत्व स्पर्धेमध्ये फळवणी शाखेतील विद्यार्थिनीचा प्रथम पिलीव शाखेतील विद्यार्थिनीचा द्वितीय व महूद शाखेतील विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक आला. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये भाळवणी शाखेतील विद्यार्थिनीचा प्रथम व फळवणी शाखेतील विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक आला आहे
वैज्ञानिक उपकरणे लहान गट व खेळणी या स्पर्धेमध्ये भाळवणी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आला आहे. वैज्ञानिक उपकरणे मोठा गट पिलिव शाखेतील विद्यार्थ्यांचा पहिला क्रमांक आला.
शेवटी बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.प्राचार्य रोकडे सर व सर्व मार्गदर्शक शिक्षक यांच्या हस्ते प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. शेवटी सर्वांचे आभार सागर काळे सर यांनी मानले. या स्पर्धा पार पडण्यासाठी श्री जवंजाळ सर ,सौ गुळवे मॅडम ,श्रीमती नागटिळक मॅडम ,मासाळ सर ,श्री माने सर ,सोनवणे सर,श्रीमती भोसले मॅडम श्री नारनवर सर ,सौ विधाते मॅडम,खरात सर श्री.शिंदे सर,काळे सर,विधाते सर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.