मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
गांधी बाल मंदिर ,कुर्ला मुंबई या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.या समारंभाला मुंबई विद्यापीठ लोककला विभागाचे मा.श्री शिवाजी वाघमारे तसेच माजी विद्यार्थिनी नूतन सातवसे .सी ए श्री अशोक राणे सर प्रमुख आथिती होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रमोद पाटील सर यांनी प्रास्ताविक केले.लोककला जपण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे.याचे मार्गदर्शन केले.नूतन सातवसे यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करावा व जीवनात यशस्वी व्हावे असा सल्ला दिला.
या प्रसंगी आदर्श शिक्षक श्री संतोष साखरे व श्री उत्तम कोळंबेकर यांचा सत्कार करण्यात आला.व्यासपीठावर श्री आश्विन निर्भवणे ,सौ मिनाक्षी वरखंडे.श्री अनिल शिर्के ,सौ शुभदा शिर्के,सौ जान्हवी परब,सौ रश्मी सातवसे.सौ सावित्री गाडगे होते.विद्यार्थ्यांनी लोककलेवर आधारित दर्जेदार कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.