सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
फ्लाय ९१ एअरलाइन्स ने २३ डिसेंबर २०२४ पासून सोलापूर ते गोवा व मुंबई अशा पहिल्या विमान उड्डाणांची घोषणा केलेली आहे. सोलापूर ते गोवा ट्रॅव्हल्स च्या दरामध्ये विमान प्रवास रु. ६८९ मध्ये सोलापूर ते गोवा असे तिकीट दर २६ नोव्हेंबरच्या एका दैनिकांत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.
सोलापूरच्या प्रगतीसाठी डॉ.संदीप आडके यांनी त्यांच्या सोलापूर विचार म्हणजे तर्फे विमानसेवा सुरू केलेली आहे. त्यास पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळावा म्हणून सोलापूर ते गोवा या संपूर्ण विमानाचे बुकिंग त्यांनी कंपनीचे सीईओ मनोज चाको व रेवन्यू मॅनेजर आशुतोष चिटणीस यांना ई-मेल द्वारे पाठवलेले आहे.
यापुढेही फ्लाय ९१ व इतर विमान कंपन्यांना आपला व सोलापुरातून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद व पाठिंबा राहील याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेले आहे.
डॉ. संदीप आडके.
सोलापूर विचार मंच, सोलापूर. ✈️
९८२२८०७००७.