जोगेश्वरी प्रतिनिधी उदय वाघवणकर तेज न्यूज
जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघात यंदा पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मनीषा वायकर यांना मिळू शकतो.मनिषा वायकर यांनी या निवडणुकीत विकासाचा मुद्दा हाती घेतला आहे.त्यांना महिलांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
माजी नगरसेवक बाळा नर आणि भालचंद्र अंबुरे यांचे त्यांना यावेळी कडवे आव्हान असणार आहे.जोगेश्वरीत एसआरए रखडले प्रकल्प, महिला सुरक्षा, फेरीवाल्यांचा प्रश्न, ट्रॉमा केअर रुग्णालयातील विविध समस्या, वाढती गुन्हेगारी असे अनेक प्रश्न आज जोगेश्वरीत आहेत.आणि त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची गरज आहे.त्यासाठी जोगेश्वरी विधानसभा मतदार संघात सक्षम उमेदवार निवडून आला पाहिजे.जेणेकरून ते विधानसभेत हे मुद्दे मांडू शकतील.