भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री शाकंभरी देवी मंदिराच्या परिसरात आज संध्याकाळी 6 वाजता त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी 1111 दिवे लावण्यात येणार आहेत. तरी परिसरातील महिला भावी भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पुजारी नागनाथ निराळी यांनी केले आहे.
श्री भवानी देवीच्या मंदिरात ही महापूजेचे आयोजन
आज आपल्या भवानी मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भवानी मातेची महापूजा श्री सचिन मधुकर शिंदे यांच्या शुभहस्ते सायंकाळी ठीक 6.00 सहा वाजता सुरू होईल व छबिना ठीक 7.00 सात वाजता सुरू होईल.
नंतर प्रसादाचे वाटप होईल याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी व पूजेचा लाभ घ्यावा अशी माहिती रामचंद्र सावंत यांनी दिली आहे.