गादेगाव प्रतिनिधी तेज न्यूज
शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे बालदिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन म्हणून संपूर्ण देशामध्ये साजरा केला जातो या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी शिवरत्न पब्लिक स्कूल येथे लहान विद्यार्थ्यांच्या मध्ये बाल दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून हा दिवस साजरा करण्यात येतो.
याही वर्षी या दिनानिमित्त विविध उपक्रम साजरे करून बालदिन साजरा करण्यात आला यावेळी बाल दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून बालकाच्या आणखी कोणते गुण असणे आवश्यक आहे याविषयी गणपत मोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करून तोंड गोड करण्यात आले.
यावेळी सहशिक्षक वर्षाराणी मोरे ,शितल मस्के ,लीना बागल ,शितल बागल ,सीमा रकटे, मसूरुद्दीन पटेल, राजेंद्र मुलाणी, दीपक देशमुख ,नियाज मुलाणी, अजय मोरे आदी सहशिक्षक उपस्थित होते या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह दिसून येत होता.