समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, विजयकुमार देशमुख, संजयमामा, महेश कोठे, देवेंद्र कोठे, अभिजित पाटील, शाब्दी, आडम मास्तरांनी भरले अर्ज,
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
साेलापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून विद्यमान आमदार, माजी आमदार व नवख्या चेहऱ्यांनी सोमवारी विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यातील काही उमेदवार कोट्याधीश असल्याचे दिसून येते.
समाधान आवताडे (भाजप)
रोख रक्कम : १,८६,५०० रुपये
कुटुंबाकडील दागिने : ६२,६०,५०० रुपये
वाहने : चार (७३ लाख रुपये)
एकूण स्थूल मालमत्ता : ६५ कोटी रुपये
स्थावर मालमत्ता : जवळपास ४९ कोटी
शिक्षण : डिप्लोमा इन सिव्हिल ॲण्ड रुरल इंजिनिअरिंग
विजयकुमार देशमुख (भाजप)
रोख रक्कम : एक लाख रुपये
दागिने : ८.५० लाख रुपये
वाहने : दोन (४६ लाख रुपये)
एकूण स्थूल मालमत्ता : ७२,८३,२९१ रुपये
स्थावर मालमत्ता : २४.२५ कोटी रुपये
शिक्षण : बी.कॉम
देवेंद्र कोठे (भाजप)
रोख रक्कम : ४८ हजार रुपये
कुटुंबाकडील दागिने : ३५.८१ लाख रुपये
वाहने : तीन (३५ लाख रुपये)
एकूण स्थूल मालमत्ता : १.२४ कोटी रुपये
स्थावर मालमत्ता : ११.९७ कोटी
शिक्षण : बीबीए
संजयमामा शिंदे (करमाळा : अपक्ष)
कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता : २९ कोटी १९ लाख ६३ हजार ३७५
कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता : २५ कोटी १४ लाख
कुटुंबाकडील एकूण सोने : २६२ ग्रॅम
वाहने : एक स्पीड बोट, चार ट्रॅक्टर, दोन चारचाकी, एक टिपर
शस्त्र : एक पिस्तूल, एक बंदूक
शिक्षण : बी.ए.
राजेंद्र राऊत बार्शी
स्थावर मालमत्ता : ३४ कोटी ९२ लाख
जंगम मालमत्ता : १२ कोटी ४० लाख
सोने : ८१ तोळे
रोख रक्कम : १५ लाख
पिस्तूल : १६ हजार
दुचाकी एक : २८ हजार
टोयाटो फॉर्च्युनर चार चाकी : ४७ लाख ४३ हजार
अभिजित पाटील (माढा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता : ५२ कोटी ९१ लाख ७ हजार ६७९
कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता : २ कोटी ८० लाख ८९ हजार १६६
कुटुंबाकडील एकूण सोने : ५९४.१७ ग्रॅम
वाहने : एक चारचाकी
शिक्षण : दहावी
फारुक शाब्दी (सोलापूर शहर मध्य, एआयएमआयएम)
कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता : २७ कोटी ७ लाख ५३ हजार ८३४
कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता : २० कोटी ७ हजार ७४७
कुटुंबाकडील एकूण सोने : ८५ तोळे, १.५ किलो चांदी
शस्त्रे : एक रिव्हॉल्वर, एक रायफल
वाहने : पाच चारचाकी, एक दुचाकी
शिक्षण : दहावी
महेश कोठे (सोलापूर शहर उत्तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)
कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता : १ कोटी ६० लाख २५ हजार
कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता : ३२ कोटी ७३ लाख ६१ हजार
कुटुंबाकडील एकूण सोने : ५७५ ग्रॅम
वाहने : चारचाकी एक,
शिक्षण : एम. बी.ए.
नरसय्या मास्तरांच्या संपत्तीच्या यादीपेक्षा गुन्हे अधिक
माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोमवारी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत त्यांच्या संपत्तीचे विवरण दिले असून, त्यांचे वार्षिक उत्पन्न करपात्र नसून त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांची यादी मात्र मोठी आहे. सर्व गुन्हे विविध आंदोलनात नियमांच्या उल्लंघनाचे आहेत. दोन वेळा आमदारकी भूषविणाऱ्या नरसय्या आडम यांच्याकडे कोणती स्थावर मालमत्ता नाही. त्यांचे वार्षिक उत्पन्नही आठ लाखांपेक्षा कमी आहे.
त्यांनी दिलेल्या पाच वर्षांच्या संपत्तीच्या विवरणामध्ये वार्षिक उत्पन्न २०२०-२०२१ व २०२१-२०२२ मध्ये ७ लाख ९० हजार इतके आहे. तर २०२२-२०२३ व २०२३- २०२४ आठ लाख ४० हजार ९०० इतके आहे. तर २०२४-२०२५ मध्ये सात लाख ९१ हजार २४० इतके आहे. नरसय्या आडम यांच्यावर विविध आंदोलनाचे सुमारे ४५ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये सर्वाधिक गुन्हे कोरोना काळातील नियम भंगाचे आहेत. तर न्यायालयात पोचलेले ४५ गुन्हे आहेत. त्यांना कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आलेले नाही.