सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री.बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्था संचलित श्री.जगद्गुरू रेवणसिद्धेश्वर प्रशाला,लिंबिचिंचोळी ता. द.सोलापूर दिनांक-१३/०९/२०२४ वार-शुक्रवार प्रशालेत "गणेशोत्सव" निमित्त व्याखानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानास लाभलेले प्रमुख पाहुणे संस्थेतील प्राध्यापक .स्वामीनाथ कलशेट्टी तथा प्रशालेच्या मुख्याध्यापिका वृषाली देगावकर ,इयत्ता १०वी वर्ग शिक्षक श्री.म्हेत्रे सर,विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री.गणेशाची आरती संपन्न झाली. याप्रसंगी परमेश्वर पाटील सर, बिराजदार सर, शिंदे सर ,स्वामी सर,शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.
या नंतर प्रशालेतील सहशिक्षक रणदिवे यांनी व्याखाते ,इतिहास अभ्यासक,प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी सर यांचे अल्पपरिचय दिले.त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धेश्वर नरोळे मामा यांच्या हस्ते कलशेट्टी सर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांनी गजराजाला वंदन करून१४विद्या,६४कला,ओम शब्दाचा विस्तृत अर्थ विद्यार्थ्यांना सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी आदर्श विद्यार्थ्यांची लक्षणे काक दृष्टी, बकोध्यानाम,स्वाननिद्रा, अल्पभोजी, गृहत्यागातूनच विद्यार्थी आदर्श बनतो.त्यानंतर २१व्या शतकामध्ये सुसंवादाचा लोप का होतोय हे सांगितले.कुसुमाग्रज यांची सुंदर कवितेतून जीवन कसे जगावे ? हे सांगितले.तसेच मानसशास्त्रातून परिपूर्ण अभ्यास करण्याची पद्धत सांगितली.आनंदी जीवन कसे जगावे हे देखील आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका देगावकर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की,जीवना मध्ये यशस्वी व्हायचे असेल खूप अभ्यास करा,आज्ञाधारी व्हा,आई -वडिलांचा मान-सम्मान करा.समाजातील प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने आदराने वागा.
या कार्यक्रमानंतर प्रशालेच्या मुख्याध्यापिका देगावकर आणि शालेय समितीचे अध्यक्ष सिद्धेश्वर नरोळे मामा यांच्या हस्ते श्री.गणेश विसर्जना निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.या नंतर शेवटची आरती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.कलशेट्टी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरोळे मामा यांच्या हस्ते करून गणपती विसर्जनाचा सोहळा थाटा-माटात,नाशिक ढोल,लेझीम नृत्य विद्यार्थ्यांनी सादर करत कार्यक्रमाचा श्री गणेशा करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणदिवे यांनी केले तर आभार बिराजदार एन. टी. यांनी केले.