पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत माळशिरस येथे शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट महाराष्ट्र, सोलापूर चे क्लस्टर समन्वयक समाधान खुपसे व माळशिरस तालुका कृषी अधिकारी श्री आबासाहेब रुपनवर यांनी शासनाच्या विविध अन्नप्रक्रिया उद्योगविषयी माहिती, आर्थिक मदत ,अनुदान, महत्त्व , शेतकऱ्यांना असणाऱ्या समस्या याविषयी मार्गदर्शन केले.
वाखरी ,पंढरपूर एमआयटी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर स्वप्नील शेठ यांनी शेतकऱ्यांना पीक शास्त्र विषय व त्याचे व्यावसायिक कृषी क्षेत्रांमधील असणारे महत्त्व, पीकशास्त्र व अन्न प्रक्रिया उद्योग याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी कृषी विभाग माळशिरस, पंढरपूर येथील संबंधित कर्मचारी व शेतकरी वर्ग उपस्थित होते