मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
पाच सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर बंगला निवासस्थानी शिंपी समाजाच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समाजाचे प्रश्न येथे निवेदनाद्वारे स्वीकारले.
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि पूर्वीच्या मोदी मंत्रालयातील रासायनिक आणि खते राज्यमंत्री, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराजजी अहिर,केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरण, भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी सर्वांच्या मागण्या स्वीकारत सर्वांना विशेष मार्गदर्शन केले. यावेळी देवेंद्रजीं फडणवीस यांची कॅबिनेट बैठक असल्याने त्यांना या बैठकीस उपस्थित राहता आले नाही. ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, ओबीसी प्रदेश महामंत्री अर्चना डेहनकर या बैठकीचे नियोजन केले होते.
यावेळी नामदेव महाराजांचे वंशज श्री निवृत्ती महाराज नामदास यांनी सर्वांच्या वतीने मुख्य मार्गदर्शन करत व प्रमुख मागण्या प्रश्न मांडले तरी अनेक भागातून आलेले समाजाच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्न मागण्या निवेदनाद्वारे दिल्या. यावेळी सर्व मागण्यांवरती जरूर विचार केला जाईल व या सर्व मागण्या देवेंद्रजी पर्यंत पोहोचवले जाईल अशी खात्री हंसराजजी अहिर व विजयजी चौधरी दिली .
यावेळी संत नामदेव महाराजांचे वंशज श्री निवृत्ती महाराज नामदास नामदेव समाजोन्नती परिषद प्रदेश अध्यक्ष श्री.संजयजी नेवासकर, अरुणजी नेवासकर, समस्त शिंपी समाज परिषद अध्यक्ष रामचंद्रजी होमकर, नामदेव समजून उन्नत्ती परिषद पुणे शहर सचिव सुभाषजी मुळे, पुणे शहर नामदेव स. उन्नती परिषद अध्यक्ष संदीपजी लचके, नामदेव शिंपी समाज युवक संघ महाराष्ट्र अध्यक्ष सिद्धेशजी हिरवे, रवींद्रजी कालेकर, महेशजी मांढरे, राकेशजी हेंद्रे, नामदेव शिंपी समाज युवक संघ रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मयुरजी हिरवे, गणेशजी काकडे, अहिल्यानगर. नामदेव समाजोन्नती परिषद जिल्हाध्यक्ष शैलेश धोकटे, जिल्हाउपाध्यक्ष श्री.सुरेश चुटके,नगर शहराध्यक्ष श्री.सुरेश लोळगे, नामदेव समाजोन्नती परिषद कर्जत तालुका महिलाध्यक्षा सौ.मनिषाताई वडे श्री.राजेश वडे भिंगार शिंपी समाजाचे सचिव श्री.संतोष माळवदे राहुरीचे श्री.नारायण धोंगडे उपस्थित होते. कृष्णाजी धोंगडे यांसह मोठ्या प्रमाणात संस्था संघटना यांचे पदाधिकारी उपस्थित होते.