पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शुक्रवार दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची महिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या पालक मेळाव्याचे उद्घाटन पालक प्रतिनिधी म्हमाणे, उप-प्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डाॅ. सोमनाथ कोळी आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान पालक प्रतिनिधी म्हमाणे यांचा उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या मेळाव्यात उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा शैक्षणिक आढावा सादर केला. दरम्यान पालक प्रतिनिधी अतुल म्हमाणे यांनी मनोगत व्यक्त केले. यादरम्यान यशस्वी विद्यार्थ्यांचा गुलाब व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा. सर्जेराव महारनवर, प्रा. अभिजित गोडसे, प्रा. प्रमोद नवले आदींसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ह्या मेळाव्याचे सुञसंचलन प्रा. गुरुराज इनामदार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अतुल कुलकर्णी यांनी मानले.