भाळवणी प्रतिनिधी
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स भाळवणी या विद्यालयात कर्मवीर अण्णांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
बहुजन उद्धाराचे महामेरू, थोर शिक्षण महर्षी, ज्ञान भगीरथ, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन स्कूल कमिटी चेअरमन संभाजी शिंदे,भगवानराव चौगुले, भिमराव जाधव, उपसरपंच नितीन शिंदे,प्राचार्य रोकडे एस.डी. यांनी केले. कलाशिक्षक डी एल गोंजारी यांनी गरूडाची आकर्षक प्रतिमा तयार करून त्यावर अण्णांची प्रतिमा ठेवण्यात आली.
दहावीच्या वर्ग शिक्षकांनी ट्रॅक्टर -ट्रॉलीची आकर्षक सजावट केली होती. मिरवणुकीमध्ये मुलींचे झान्झ पथक,टिपरी नृत्य,लेझीम पथक,ढोलताशा यामधून विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपली कला प्रदर्शित केली. या पथकांचा सराव क्रीडा शिक्षक गजानन जमदाडे , काळे सागर, विधाते बी.ए. , माने डी.एम. , श्रीमती भोसले एम .के. यांनी करून घेतला. मिरवणूक अतिशय शिस्तीने गावातून काढण्यात आली.
भाळवणी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच रणजीत जाधव यांनी अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले.ठिकठिकाणी गावामध्ये अण्णांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामस्थांनी केले. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना खाऊ व पाण्याचे वाटप केले. मिरवणूक नियोजनबद्ध व शिस्तीने पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. शेवटी विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली.