सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
अकोला येथील पत्रकार अजय प्रभे यांच्यावर डिझेल पेट्रोल माफियानी जीवघेणा हल्ला केला आहे.
सदर ची घटना बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत कोळंबी येथील रॉयल धाब्यावर घडली होती या ठिकाणी अवैध पेट्रोल डिझेलची विक्री करत असल्याचे पत्रकार अजय प्रभे यांच्या लक्षात आले असता त्यांनी व्हिडिओ शूट करून सदर प्रकार टिपण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी असलेल्या धाबा मालकाच्या यांच्या हे लक्षात आले पत्रकार अजय प्रभे यांना चित्रीकरण करण्यापासून रोखण्यासाठी तेथील ढाबा चालकांनी आपल्या दहा ते पंधरा कामगारांसहित पत्रकार अजय प्रभे यांच्यावर प्राण घातक हल्ला केला व तसेच त्यांचा मोबाईल फोडून टाकला. या प्राणघातक हल्ल्यात पत्रकार अजय हे गंभीर जखमी झाले होते.
त्यांच्यावर मूर्तीजापुर येथील लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू होते अकोला जिल्ह्यात पत्रकारांना जीवे मारण्याची ही दुसरा दुसरी घटना असून गृह खात्याकडून या विषयी कुठली दखल घेतली जात नसल्याने पत्रकारांमधून संताप व्यक्त केला जात आहे पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक पारित होऊन देखील पोलिसांकडून त्यांची अंमलबजावणी का केली जात नाही? असा प्रश्न पत्रकारांना पडलेला आहे. अकोला येथील पत्रकार अजय प्रभे यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून पत्रकार सुरक्षा समिती वतीने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख जिल्हा संघटक आन्सर तांबोळी शहर अध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक शिवनिर्णय चे वैजिनाथ बिराजदार रवी रणदिवे मेहबूब कादरी उपस्थित होते.
पत्रकार सुरक्षा समितीच्या निवेदन ची दखल
अकोला येथील पत्रकार अजय प्रभे यांना मारहाण करणाऱ्या व्यक्ती वर कारवाई करण्यात यावी म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले होते या निवेदन ची बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत पत्रकार अजय प्रभे यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कलम 323, 504, 506 भा द वी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.