श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर गणेशोत्सव संगीत महोत्सव
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या अथक परिश्रमातून प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेल्या श्री संत तुकाराम भवन येथे श्री गणेशोत्सव संगीत महोत्सवात पाचवे पुष्प महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक नागेश आडगांवकर यांनी गुंफले.
सुरुवातीला सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर . सदस्या शकुंतला नडगिरे , व्यवस्थापक मनोज श्रोत्री.गायक नागेश आडगांवकर रोहन पंढरपूरकर.ज्ञानप्रसाद फुलारी यांच्या शुभहस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.त्यांनी सुरुवातीला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंग गात वातावरण भक्तीमय करत विविध संतांच्या भावपूर्ण भक्तीरचना आपल्या दमदार व भावपूर्ण स्वरांतून सादर केल्या त्यामध्ये रुप पाहता लोचनी.वेढा रे वेढा पंढरी.समाधी साधन.पंढरी पंढरी नगरी.विष्णूमय जग.उदंड आयुष्य.विठ्ठल पाहणे हाची इच्छा अभंग गायन करत रसिकांच्या आग्रहास्तव याद पिया की आये गुरु उस्ताद रशीद खान यांची आठवणी जागवल्या.शेवटी सावळे रुपडे भैरवी गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.त्यांना तितकीच सुंदर आणि साजिशी साथसंगत तबला रोहन पंढरपूरकर हार्मोनियम ज्ञानप्रसाद फुलारी पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ माऊली खरात स्वरसाथ शुभम भोरकर.वैष्णव गेवतरकर. भैरवनाथ जाधव..यांनी केली.अविस्मरणीय कार्यक्रम लक्षात राहील असा झाला.सुत्रसंचलन विक्रम बिस्किटे सरांनी केले यावेळी पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कला रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.असेच सुंदर कार्यक्रम सादर करावेत अशी रसिक श्रोत्यांनी विनंती करत भरभरून प्रतिसाद दिला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी अधिक परिश्रम घेत आहेत या संगीत महोत्सवाची सांगता पं.रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने होणार असून यासाठी रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचे वतीने करण्यात आले आहे.