पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या प्र. तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष पदी शंकर सुरवसे व जिल्हा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी शरद पवार व दिलीप पावले तर जिल्हा प्रवक्ता पदी विजय कुलकर्णी ह्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आज पंढरपूर येथे पार पडलेल्या रास्त भाव दुकानदार संघटनेच्या बैठक शुभारंभ प्रसंगी अखंड हिंदुस्थानाचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब ह्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित करत अभिवादन केले, ह्या जल्लोष पुर्ण वातावरणात महाराजांना गारद व जयघोष देण्यात आल्या.त्यानंतर गेल्या आठ्ठावीस युगे कंबरे हात ठेवून भक्तांवर कृपादृष्टी ठेवणाऱ्या श्री.विठूमाऊली च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.संघटना वाढीसाठी युवकांना संधी देत जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर,तालुकाध्यक्ष शंकर सुरवसे,शरद पवार, विजय कुलकर्णी,वहाब शेख,उमेश आसादे ह्यांच्या शुभहस्ते सन्मानपुर्वक नियुक्ती पत्र देऊन पदाची घोषणा करण्यात आले.
तालुकाध्यक्ष श्री.शरद पवार ह्यांनी संघटनेच्या वाढी व नवनिर्वाचित युवकांना नव्याने संधी मिळावी ह्याकरिता तालुकाध्यक्ष पदाचे राजीनामा दिले.प्रभारी तालुकाध्यक्ष व पंढरपूर शहराध्यक्ष पदी श्री.शंकर दादा सुरवसे व जिल्हा संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री.शरद पवार व श्री.दिलीप पावले तर जिल्हा प्रवक्ता पदी श्री.विजय भाऊ कुलकर्णी ह्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आले.
ह्यावेळी पंढरपूर शहर अध्यक्ष म्हणून सर्वानुमते मा.श्री.शंकर (दादा ) सुरवसे यांची निवड करण्यात आली.इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे -
कौशल्या पाटील :-जिल्हा संघटक
आप्पा भुई :-तालूका संघटक
नाना भुई :-जिल्हा संघटक
सुधाकर शेळके :-जिल्हा संघटक
सुरेश पवार :-जिल्हा संघटक
दीपक यलमार :-जिल्हा संघटक
शहर उपाध्यक्ष :-सौ.अपर्णा तारके,श्री. संजय पवार .
शहर संघटक :-श्री. सागर जाधव .
सचिव :-श्री.सोमनाथ कुलकर्णी .
सह सचिव :-श्री. अमर भांडेकर.
खजिनदार :-श्री.सोहम भिंगे .
मार्गदर्शन मंडळ :-श्री.हरिभाऊ चव्हाण,श्री. शशिकांत सुगंधी,श्री.विठ्ठल भिसे,श्री. माऊली पारसवार .
ह्या सर्व नूतन पदाधिकारी नियुक्ती पत्र यावेळी मान्यवर उपस्थित यांच्या शुभहस्ते देण्यात आले.जिल्हाध्यक्ष श्री.सुनील पेंटर यांनी संघटन आढावा घेऊन ,विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, लवकरच थकीत कमिशन रक्कम जमा होईल असे सांगून संघटना पाठपुरावा करत आहे,असे स्पष्ट केले.नितीन पेंटर यांनी नूतन पदाधिकारी यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करताना कामाची पध्दत समजून सांगून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या सांगितल्या,संघटन बळकटीकरण साठी नक्की काय करावे ? ते स्पष्ट केले.सर्वांची नवनियुक्ती होत असतानाच जिल्हा उपाध्यक्ष श्री.दिलीप पावले ह्यांनी नवीन पदाधिकारी यांना साथ देत संघटना बळकटीकरण साठी वाहून घेण्याचे आवाहन केले.सर्व कामकाज खेळीमेळीचे व उत्साहात पार पडले.कार्यक्रमाचे प्रस्तावना शशिकांत सुंगधी तर सूत्रसंचालन विजय कुलकर्णी आणि आभार नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष शंकर सुरवसे ह्यांनी आभारातून व्यक्त केले.
यावेळी सोलापूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल पेंटर,राष्ट्रीय सचिव तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्री.नितीन पेंटर,जिल्हा सचिव श्री.राज कमटम,जिल्हा उपाध्यक्ष श्री.उमेश असादे,श्री.वहाब चाचा शेख यांच्या सह पंढरपूर तालूका व शहररातील बहुसंख्य दुकानदार बंधू भगिनीं उपस्थिती होते.