सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री देवीच्या नवरात्री कालावधीत परसबाग सोलापूर या पर्यावरणीय व्यासपीठाच्या वतीनें देशी वृक्ष संवर्धिका या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील श्री देवीच्या मंदिर परिसरात शमी या देशी वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.
दिनांक ३ आक्टोबर रोजी या उपक्रमाचा प्रारंभ होणार असुन दिनांक १२ आक्टोबर दस-याला समारोप करण्यात येणार आहे.
सोलापूर शहराचा विस्तार वेगाने होतोय. सध्या दस-याला सिमोल्लंघनासाठी शहराच्या विशिष्ट भागातच मोठी गर्दी होते.पुढील काळात या गर्दीचे विभाजन होऊन नागरिकांना घरापासुन जवळच सिमोल्लंघनाची सोय व्हावी आणि देवी दर्शनही घेता यावे या हेतुनें परसबागनें हा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
परसबाग समुहातील सदस्य आणि शहरातील पर्यावरण प्रेमींनी आपापल्या भागामध्ये किंवा आपापल्या माहितीतील श्री देवी मंदिराचे नाव, संपर्क व्यक्तीचे नाव,फोन नंबर आणि पत्यासह ठिकाणाची माहिती 9960008220 यावर WhatsApp message द्वारे पाठवावी.त्यामध्ये आपले स्वतःचे नाव आणि मोबाईल नंबर चा स्पष्ट उल्लेख करावा.मंदिर परिसरात झाड लावल्यावर पालकत्व तत्वावर त्याचे संवर्धन होईल ही बाब महत्त्वाची आहे हे लक्षात घ्यावे.
नारायण पाटील, संस्थापक
परसबाग सोलापूर मो.९९६०००८२२०