!!सोनपावलांनी गौराईचं झाले आगमन.दुधाणे परिवाराचे लक्ष्मी चरणी तनमनधन समर्पण!!
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
आला पोळा सगळे सण झाले गोळा याप्रमाणे शेतकरी राजाचा सणही आनंदाने साजरा झाला. आणि गणपती बाप्पाचं आगमन झालं लगेच गौराईच आगमन सर्व महिलांची या सणात होणारी धावपळ खरोखरच वाखाणण्याजोगी असते.गौराईचा फराळ.सगळी मांडणी.सजावट.आदी मध्ये तीन दिवस तन्मयतेने तल्लीन होऊन महालक्ष्मीचं स्वागतासाठी सज्ज असतात.
याचवेळी करकंब येथील देवकी ज्ञानेश्वर दुधाणे परिवाराच्या वतीने सामाजिक संदेश देत पहिल्यांदाच गौराईचा सुंदर आरास केली.त्यामध्ये टाकाऊ कागदापासून सुंदर झाड तयार करत त्या झाडावर विविध पक्षी.त्यांची घरटी दाखवत झाड लावली पाहिजेत झाड जगवली पाहिजेत.त्यामुळे पशुपक्षी यांचाही आधार झाड बनतात शिवाय पर्यावरण रक्षणही होत हा संदेश देत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी सुसज्ज अभ्यासिका पाहिजे.आणि वाचाल तरच वाचाल हा संदेश देत स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची लायब्ररी निर्माण करुन संतवाॾ्मय ही तितकीच महत्त्वाची आहेत हाही संदेश देत व्यसनाधीन तरुणांनो व्यसन करु नका.अभ्यास केला तरच जीवनात यशस्वी व्हाल असा सामाजिक संदेश दिला.तसेच ओला कचरा सुका कचरा वेगळा करून घंटागाडीचा वापर करून आपला परिसर आणि गाव स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असाही संदेश देत एक आगळीवेगळी महालक्ष्मीची आरास करण्यात आली.
यावेळी अनेक ग्रामस्थांनी राज सजावट पाहण्यासाठी गर्दी केली होती.ही सुंदर आरास करण्यासाठी देवकी दुधाणे.अनुपमा दुधाणे.ज्ञानेश्वर दुधाणे गणेश दुधाणे.दत्तप्रसाद दुधाणे.सुरभी दुधाणे.कैवल्य दुधाणे परिवाराने अधिक परिश्रम घेतले.