सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
केगांव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४ विद्यार्थ्यांचे 'कॅपजेमिनी' या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे.
यामध्ये रिद्धी शेट्टी, सामिया खान, मानसी राकळे,सफुरा पेरांमपल्ली या विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना वार्षिक ४ लाख पॅकेज मिळाले आहे.कॉम्प्युटर विभागातील विद्यार्थ्यांची निवड झाली.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंहगड संस्था ही नेहमीच अर्ग्रेसर असते.विद्यार्थ्यांच्या कर्तृत्व गुणांना वाव देण्याचे काम सिंहगड संस्था करत असते.विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीचे तज्ञ् प्राध्यापकांकडून प्रशिक्षण देण्यात येत असते व त्याचा फायदा मुलांना प्लेसमेंटसाठी होत आहे.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव तथा सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर श्री.संजय नवले, प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे व डॉ.शेखर जगदे, डॉ.विनोद खरात, डॉ.प्रदीप तपकिरे, डॉ.विजयकुमार बिरादार, प्रा.हरीश गुरमे, प्रा.सुरज धनवे,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे व तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.