पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एक हात मदतीचा या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर तहसील कार्यालय येथे तहसीलदार सचिन लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला .
या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हा सचिव संजय जगताप तालुका अध्यक्ष उमेश गोडसे शहराध्यक्ष गणेश ननवरे यांचाही सत्कार केला.या कार्यक्रमासाठी असंख्य प्रहार सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात जिल्हा सचिव संजय जगताप यांनी तहसीलदार यांच्या कामाचे कौतुक करून अपंगाच्या समस्येबद्दल विविध मागण्याही केल्या सर्व मागण्या तहसीलदार यांनी मान्य करून संबंधित विभागांना सूचना केल्या त्यानंतर तहसीलदार यांनी संजय गांधी निराधार योजनेचे सर्व अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.