विटा प्रतिनिधी तेज न्यूज
बदलापूर कलकत्ता येथील घटनांचे पडसाद सुरू असताना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील धोंडेवाडी येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
श्रावण महिन्यातील सोमवारी शंकर महादेवाच्या पिंडीवर पाणी घालून अभिषेक करताना मातंग समाजातील एका मुलीला मंदिरातुन हाकलून लावले या घटनेची माहिती मिळताच मातंग समाजाचे नेते संदीप तात्या ठोंबरे विरु भैय्या फाळके विक्रम भिंगारदेवे मास्टर सयाजी सकट,नाथा खिलारे आणि पिडीत मुलीला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये ठाण मांडले.मा.उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनी याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला होता पोलीसांच्या विनंतीला मान देऊन वेळ दिला होता आज संबंधित दोषींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्यान्वये विटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी विटा तहसील कार्यालयावर समस्त मातंग समाजाचे वतीने आणि फकीरा पॅंथर सेनेचे माध्यमातून24आगस्ट रोजी आकरा वाजता विटा तहसील कार्यालयासमोर अभिषेक आंदोलन करण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्यातील तमाम मातंग समाजाच्या सर्व पक्ष संघटना यांच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन फकिरा पॅंथर सेनेचे विरु भैय्या फाळके ,मास्टर सयाजी सकट यांनी केले आहे.