सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि.९ ऑगस्ट रोजी कलकत्ता येथील एका डॉक्टर विद्यार्थिनीचा बलात्कार व खून झाल्याच्या व त्यानंतर तेथील डॉक्टरांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या संघटनेने शनिवार दि.१७/०८/२०२४ रोजी देशव्यापी संप पुकारलेला आहे .
शनिवारी सर्व सरकारी व खाजगी हॉस्पिटल्स व क्लिनिक्स मधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा बंद राहतील. त्याच्या समर्थनार्थ सकाळी दहा वाजता आय एम ए हॉल, डफरीन चौक ,सोलापूर येथून सोलापुरातील सर्व पॅथीचे डॉक्टर्स, फिजिओथेरपीस्ट, सिस्टर्स, पॅरामेडिक्स, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह व इतर वैद्यकीय संघटनांनी निषेध मोर्चाचे आयोजन केलेले आहे. वैद्यकीय क्षेत्रात दररोज होणाऱ्या अशा निषेधार्थ हल्ल्यावर सरकारने कारवाई करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी या निषेध मोर्चाचे आयोजन केलेले आहे.
त्यामध्ये सोलापुरातील सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन आय एम ए सोलापूर तर्फे करण्यात आले आहे.