माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
वेळापूर येथे श्री महादेव देवालय देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमी सणानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या होणाऱ्या नागपंचमी महोत्सवात सर्व मुलींनी महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असे आवाहन ट्रस्टीकडून करण्यात आले आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमी सणाचे औचित्य साधून दिनांक ९ व दिनांक ११ रोजी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक ९ रोजी महादेव देवालय देवस्थान ट्रस्ट भक्तनिवास या ठिकाणी रांगोळी, मेहंदी, केशरचना, फॅन्सी ड्रेस ,संगीत खुर्ची, लिंबू चमचा, उखाणे चेंडू खेळ तर दिनांक ११ रोजी सुई दोरा,आकडेवारी गंमत अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमास श्री स्वामी समर्थ केंद्र,वेळापूर महिला सर्व महिला बचत गट वेळापूर यांचे सहकार्य लाभले आहे. या नागपंचमी महोत्सवामध्ये महिलांना नागपंचमीचा विशेष आनंद लुटण्यासाठी मोठे झोके देखील बांधण्यात आले आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.