सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
अस्मिता ताईंची वारी, गुणवंतांच्या दारी.... या उपक्रमांतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांची कर्णिक नगर येथील गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन प्राध्यापक अशोक काजळे, प्रबोधन सेनेचे अध्यक्ष श्री टी .ए. जाधव ,कर्णिक नगरचे माजी चेअरमन प्रा. कृष्णात देवकर कर्णिक नगर गृहनिर्माण संस्थेचे सचिव छत्रपती केने व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव ठोंगे- पाटील यांच्या दारी मंगळवारी दि.१३/८/२४ रोजी सकाळी दाखल झाली. त्यांनी अस्मिता ताईंच्या कार्याचा गौरव करीत कर्णीक नगरच्या जडणघडणीत व विकास कामात अस्मिताताईंचा वाटा मोठा आहे त्यांना विकास कामाची जाण आहे. संपर्क देखील चांगला आहे त्यामुळे आगामी काळात त्यांना सोलापूर शहर मध्य विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी असा आमचा मानस आहे.आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.अशा शब्दात आपल्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या.
याशिवाय अस्मिता गायकवाड यांनी देखील या सर्वा विषयी ऋण व्यक्त करीत आपले सहकार्य व आशीर्वाद कायम पाठीशी राहावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरातील सुमारे १००० गुणीजनांचा या माध्यमातून सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी सर्व गुणीजनांचा सपत्नीक शाल, रोप, व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमात त्यांच्या समवेत ॲड .सुरेश गायकवाड, संतोष गद्दी, नागेश शिरूर, राजु शिंदे ,प्रियंका वाघमोडे ,रोहन श्रीराम आदी उपस्थित होते.