पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रीयकृत असणार्या अनेक बँका आता ग्रमीण भागामध्ये आपल्या शाख निर्माण करीत आहेत. त्यामुळे ग्रमीण भागातील नागरीकांना उत्तम बँकींग सुविधा मिळत असून त्यासाठी त्यांना शहरी भागाकडे धावपळ करावी लागत नाही. अशाच प्रकारचा लाभ बँक ऑफ बडोदाच्या शाखेमुळे रोपळेसह परिसरातील नागरीकांना मिळत आहे. यामुळे बँकींग क्षेत्रातील अनेक समस्या सुटण्यास मोठी मदत झाली आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा भुमिअभिलेख कार्यालयाचे अधिक्षक शिवाजी भोसले यांनी केले.
बँक ऑफ बडोदाच्या ११७ व्या वर्धापन दिना निमीत्त पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील शाखेमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी शिवाजी भोसले बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी बँकेचे गावाला सहकार्य असून गावाचेही बँकेला सहकार्य आहे. यामुळे भविष्यकाळामध्ये दोन्ही घटकांच्या प्रगतीसाठी या बाबी महत्वपुर्ण ठरणार आहेत. तरी नागरीकांनी या बँकेच्या तसेच बँकेच्या माध्यमातून मिळणार्या शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे अवाहनही यावेळी त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी उपसरपंच विलास भोसले, नागनाथ माळी , नारायण गायकवाड, जीवन पाटील , अविनाश कदम, माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ , पोपट शहा, मुख्याध्यापक औदुंबर गायकवाड, हर्षवर्धन शहा, डॉ.महावीर शहा, डॉ. हनुमंत खपाले, जनहीतचे औदुंबर गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शाखाधिकारी गणेश मुळे यांनी प्रस्ताविक करून बँकेच्या कार्याची माहिती दिली. तर मधुकर गुजाळ, औदुंबर गायकवाड, नागनाथ माळी , हर्षवर्धन शहा, नारायण गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे शाखाधिकारी गणेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे कर्मचारी सागर उमाटे, राजू भराटे, दिलीप सुर्यवंशी, नागेश मोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक सोमनाथ जगताप यांनी केले. यावेळी बँकेचे सभासद उपस्थित होते.