बगा नंबर 14 चे कारभारी हल्लाप्पा सुरणवर यांची माहिती
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरीची आषाढी वारी जगामध्ये एक औत्सुक्याचा विषय ठरलेला आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यासह महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील विविध संताची शेकडो वर्षाची परंपरा या पालखी सोहळ्यास लाभलेली आहे. आजही लाखोच्या संख्येने येणारे वारकरी आळंदी देहू तसेच महाराष्ट्रच्या विविध कानाकोपऱ्यातून पायी वारी करत पंढरपूरला येतात आयुष्यामध्ये एकदा तरी वारी अनुभवावी अशीच भावना प्रत्येक वारकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य लोकांमध्येही असते.
आषाढी वारी मध्ये संतांच्या पालखी सोहळ्यासोबत चालणाऱ्या मनाच्या व क्रमांकाच्या दिंड्या या आपला रोजचा दिनक्रम ठरल्याप्रमाणे पार पडत असतात रोजच दिनक्रमातील नियम परंपरा पाळत अखंड सुखाच्या अध्यात्मिक भावनेची वारकरी अनुभूती घेत असतात त्यासाठी तर ते रोजच्या कामाच्या गर्डातून सवड काढून अनेक अडचणींना संकटना तोंड देत वारीमध्ये सहभागी झालेले असतात वर्षभराची प्रचंड ऊर्जा या वारीच्या पंधरा दिवसाच्या कालावधीतून ते आपल्याबरोबर घेऊन जात असतात तीच संस्कृत ऊर्जा त्यांना वर्षभर आपले आनंदी आध्यात्मिक जीवन जगण्यास उभारी देत असते त्यासाठी त्यांना वारीची पूर्ण अनुभूती मिळणे गरजेचे असते सर्व संतांच्या पालखी सोहळ्या सोबत असणारे प्रत्येक मनाच्या व क्रमांकाच्या दिंड्या हा सर्व वारीचा प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत अद्यात मोती अनुभवतच असतात. पण त्यांच्यासोबत दिवसेंदिवस वाढत जाणारी मोकाट गर्दी वारीच्या मूळ संकल्पनेस तडा पोचवत वारकऱ्यांचा आनंद हिरावून घेत असल्याचे दिवसेंदिवस जाणवत आहे शेकडो वर्षापासून अनेक घराणी वारीची परंपरा जपत असतात . वारकरी स्वतःच्या खांद्यावर भगवी पताका माता भगिनी डोक्यावर तुळशी वृंदावन काहीजणी पाण्याचा हंडा घेऊन वारीमध्ये मार्गक्रमण करत असतात. हीच परंपरा जपत श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर यांच्यावतीने सांगोला तालुक्यातील चिंचोली गावात आषाढी वारीचे नियोजन करण्यात आले आहे. तरी सर्व बाळूमामा भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान बघा नंबर 14 चे कारभारी श्री बाळू सिद्धाप्पा सुरणवर आणि श्री हल्लाप्पा सिद्धाप्पा सुरणवर सर्व भाविकांना यांनी आवाहन केले आहे.
सोमवारी 15 /7 /2024 रोजी ओव्या सकाळी दहा वाजता भव्य मिरवणूक संध्याकाळी सात ते नऊ काशिलिंग ओविकार मंडळ धायटी जय बाळूमामा ओवीकर मंडळ कदमवाडी 16 जुलै रोजी मासाळवाडी गजी ढोल मंडळ आटपाडी जिल्हा सांगली धुळदेव गजी ढोल मंडळ शेळकेवाडी शिवणे 17 जुलै रोजी सायंकाळी सात ते नऊ पर्यंत सत्यवान गावडे महाराज येलूर बिरुदेव ओविकार मंडळ येलूर ता वाळवा जि सांगली यांच्या ओव्या होणार आहेत.
18 जुलै रोजी बाळूमामा जीवन चरित्र कथाकार मामाचे सेवक मेजर वासुंदेकर बाळूमामा मालिका फेम रामांणणा सकाळी 7 ते 9 तरी सर्व भाविक भक्ताने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी आव्हान कारभारी हल्लाप्पा सुरणवार यांनी सांगितले आहे.