शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
अखंड विश्वाचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पालख्यांचा सोहळा बरोबर लाखोंची भक्त मांदियाळी बा विठ्ठलाकडे प्रस्थान करीत असतात,जगातील सर्वात श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचा वारसा,एका पिढीकडून नविन पिढीकडे जावा,या उद्देशाने अनेक वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणाऱ्या,संस्कारक्षम प्रशालेमध्ये दिंडी सोहळ्याचे आयोजन वेगवेगळ्या पद्धतीने होत असते,वैशिष्टयपूर्ण, विविधतेने नटलेल्या शेळवे येथील नवोपक्रमशील सनराईज पब्लिक स्कूल शेळवे, या प्रशालेने यावर्षी अनोख्या पद्धतीने दिंडी सोहळ्याचे नियोजन करीत विद्यार्थी वारकऱ्यांचा सायकल गोल रिंगण सोहळा आयोजित केला होता,खरं तर ही नाविन्यपूर्ण कल्पना होती,आपण पाहत असतो अनेक विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी सायकल वरून आपल्या ज्ञान मंदिराकडे येतात,त्यांना तेथील ज्ञानदेवतांची आस लागलेली असते,तसेच अनेक वारकरी आपल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी चालत येतात,त्यांना विठ्ठल भेटीची ओढ लागलेली असते, वारकऱ्यांच्या प्रथेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे रिंगण सोहळे होतात,त्यामध्ये उभे रिंगण, गोल रिंगण,मेंढ्यांचे रिंगण,घोड्यांचे रिंगण परंतु विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या संस्कृतीचे म्हणजेच वारकरी संप्रदायाचे वेध लागलेले असते,आणि म्हणूनच सणराईज पब्लिक स्कूल,शेळवे येथील विद्यार्थ्यांनी यावर्षी आपल्या प्रशालेत विद्यार्थी वारकऱ्यांचा सायकल गोल रिंगण सोहळा साजरा केला,अशा पद्धतीचा अनोखा सायकल गोल रिंगण सोहळा तोही विद्यार्थी वारकऱ्यांच्या स्वरूपात आज पर्यंत कधीही पाहायला मिळालेला नव्हता तो या प्रशालेतील विध्यार्थ्यांनी अगदी नयनरम्य व विलोभनीय पद्धतीने यशस्वीपणे पूर्ण केला,त्याच बरोबर सनराईज पब्लिक स्कूल शेळवे ने आपल्या विद्यार्थ्यांकडून तुकोबा चे अभंग,भजन,गवळण,नामदेवांचे भारुड,कीर्तन,प्रवचन,पावली, फुगडी तसेच संत गोरोबा कुंभार यांची एक हृदयस्पर्शी अनोखी जीवनी सादर केली,शाळेपासून शेळवे गावापर्यंत श्री विठ्ठलाच्या पालखीची मिरवणूक करून,गावामध्ये गेल्यानंतर अनेक वेगवेगळे वारकरी संप्रदायाचे उपक्रम विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.
सदर उपक्रमास गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या नयनरम्य दिंडी सोहळ्यासाठी सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोशाखात आलेले होते अनेक विद्यार्थिनींनी महिला वारकऱ्यांचा पोशाख केलेला होता, मृदंग,विणा,पखवाज याचबरोबर गळ्यामध्ये तुळशी माळ डोक्यावरती तुळस अशा प्रकारचा वारकरी सांप्रदायाची महाराष्ट्रीयन वेष भूषा परिधान केली होती,वारकरी दिंडीचा विद्यार्थी मध्ये खूप मोठा जल्लोष होता त्याच बरोबर विद्यार्थी भक्तीभावामध्ये, भजनामध्ये तल्लीन झाले होते,
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सणराईज पब्लिक स्कूलचे उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड,राम मोकळे,योगेश गायकवाड,कबीर शेख,दिपाली कुंभार मनीषा गोरे,अश्विनी यलमर,हर्षदा पन्हाळकर,तृप्ती कोरे , सिरतअरा शेख,सोनाली गायकवाड,प्रियांका गाजरे,ऐश्वर्या भाईक,सौ.भिंगारे,अस्मातारा शेख तसेच सर्व वाहतूक कर्मचारी,सर्व शिक्षकेतर कर्मचारी,सर्व पालक परिवार यांनी खूप मोठे परिश्रम घेतले.
वारकरी दिंडी सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यासाठी प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे,संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे,संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.दिंडी सोहळ्याची सुरुवात बा विठ्ठलाच्या आरतीने करून दिंडी सोहळ्याची सांगता संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आरतीने करण्यात आली....!!