सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि. 19आणि 20 जुलै 2024 दरम्यान वालचंद क्रीडा संकुल सोलापूर येथे झालेल्या फुटबॉल सामन्यांमध्ये सिंहगड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी 15 वर्षाखालील मुले , 17 वर्षाखालील मुले व मुली या संघांनी सहभाग घेतला होता व तिन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली . सिंहगड पब्लिक स्कूलच्या पंधरा वर्षाखालील मुलांनी रोमहर्षक कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकावला.
त्यामधे त्यांनी विठ्ठलराव शिंदे हायस्कूल अंबाड माढा या संघाचा 5-0 ने पराभव केला या सामन्यामध्ये विरांश वर्मा ने 3 गोल तर अतुल कुमार सिंग 2 केले गोल , क्वार्टर फायनल मधे प्रयाग कराड MIT बार्शी विरुद्ध 2 - 0 गोल नी पराभव केला या सामन्यामध्ये यश राऊत व वीरांश वर्मा ने प्रत्येकी एक - एक गोल केला ,सेमी फायनल मध्ये सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल बार्शी चा पेनल्टी शूट आउट मधे 3-2 असा पराभव केला व झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात ग्रीन फिंगर्स अकलूज या संघाचा पेनल्टी शूट आउट मध्ये 4-3 असा पराभव करून विजय संपादन केला.
त्याचबरोबर 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने ग्रीन फिंगर्स अकलूज या संघाचा 1-0 असा पराभव केला त्यामध्ये हर्षद गायकवाड ने 1 गोल केला ,त्यानंतर प्रयाग कराड MIT बार्शी विरुद्ध 2-0 असा पराभव केला या सामन्यात समर्थ शिंदे व हर्षद गायकवाड यांनी प्रत्येकी 1 गोल केला व अंतिम सामन्यात पेनल्टी शुट आउट मधे महाराष्ट्र विद्यालय बार्शी या संघाविरुद्ध 4-3 अशा फरकाने सामना गमावत द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच 17 वर्षाखालील मुलींच्या संघाने देखील चमकदार कामगिरी करून तृतीय क्रमांक पटकावला.या सर्व यशस्वी खेळाडूंना संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर श्री संजय नवले यांचे प्रोत्साहन लाभले तसेच शाळेच्या प्राचार्या निखहत शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक प्रशांत जाधव, सीमा मादगुंडी व अजित कट्टे यांचे मार्गदर्शन लाभले.