भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
वसंतराव काळे विद्यामंदिर भाळवणी (ता.पंढरपूर) इयत्ता तिसरीतील विद्यार्थीनी कु.आर्या संभाजी शिंदे हिने जिल्हास्तरीय आयोजित अबॅकस परीक्षेमध्ये तोंडी व लेखी परीक्षा मध्ये २५० पैकी २३९ गुण मिळवुन उज्वल यश संपादन करुन A श्रेणी प्राप्त केली आहे.या यशाबद्दल चेअरमन कल्याणराव काळे यांनी तिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
या घवघवीत यशासाठी प्रशालेतर्फे तिला प्रशालेचे मुख्याध्यापक एस एल काळे व वर्गशिक्षिका पी पी काळे यांचे मार्गदर्शन लाभले . तिच्या या यशाबद्दल पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशालेतील सर्व विद्यार्थी,पालक, सहशिक्षक उपस्थित होते.