सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सव उत्साहात झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार होत्या. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन व खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत आले तदनंतर इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासकीय पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.
यावेळी बसवराज बिराजदार, लक्ष्मण कांबळे, हणमंत कुरे, विशाल खाडे, बजरंग शिरसाट, अमोल गुडेवाडी, मल्लिकार्जुन बिराजदार , किरण साळुंखे रविकांत पोतदार, महेंद्र वाघमारे, वैशाली गुजर, सुजाता फुलारी, शितल चमके, शारदा लोमटे, आशाराणी गायकवाड, वंदना तेली, गौरी रेके, मंगल स्वामी, नागेश कलंत्री आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापिका वैशाली कुंभार म्हणाले सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासाबरोबर विविध उपक्रमात सहभागी व्हावे.आदर्श विद्यार्थ्यांचे गुण वैशिष्ट्य सांगून शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम,सहल, क्रीडा स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षा, चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धेत उत्साहात सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला भांड यांनी केले.